पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार, चंद्रकांत पाटीलांची उचलबांगडी

0
545

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – मागील अनेक दिवसांपासून राज्यातील पालकमंत्री नियुक्तीचं तिढा सुटत नव्हता. स्वातंत्र्य दिनी देखील अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी झेंडावंदन केलं होतं. तर पुण्याच्या पालकमंत्रीपदी कोण असणार, असा पेच होता. आजअखेर हा पेच सुटला असून पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार असतील, तर चंद्रकांत पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री असणार आहे.

आज अकरा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली आहे.
अजित पवार : पुणे
चंद्रकांत पाटील – सोलापुर
वियज कुमार गावित – भंडारा
राधाकृष्ण विखे पाटील – अकोला
दिलीप वळसे पाटील – बुलढणा
हसन मुश्रिफ – कोल्हापूर
धर्माराव बाबा आत्राम – गोंदिया
धनंजय मुंडे – बीड