पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट

0
19

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने आज येलो अलर्ट जारी केला आहे, ज्यामुळे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट असून, तिथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अपेक्षित आहे. आज सकाळपासून शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला असून, घाटमाथ्यावर सध्या मुसळधार पाऊस पडत आहे.
घाटमाथ्यावर आणि खडकवासला धरण साखळी परिसरात मोठ्या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची मोठी आवक होत आहे. पहाटे तीन वाजल्यापासून खडकवासला धरणातून मुठा नदीत तब्बल १० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण साखळी ९१% भरल्यामुळे हा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मुठा नदीकाठावरील नागरिकांना आणि शहरातील सर्वच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दि.28.09.2025 धरणातून नदी पात्रात सोडण्यात आलेला एकूण विसर्ग खालील प्रमाणे (दुपारी 3.00 वाजता)

  1. भामा आसखेड – 13312 क्युसेक
  2. वडीवळे – 5216 क्युसेक
  3. आंद्रा – 980 क्युसेक
  4. पवना – 3650 क्युसेक
  5. कासारसाई –450 क्युसेक
  6. मुळशी – 7000क्युसेक
  7. टेमघर – 0 क्युसेक
  8. वरसगाव – 1197 क्युसेक
  9. पानशेत – 1095 क्युसेक
  10. खडकवासला – 4510 क्युसेक