पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची बदली, सी.एल. पुलकुंडवार यांची नियुक्ती

0
244

पुणे, दि. ६ (पीसीबी) : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सी.एल. पुलकुंडवार यांची नियुक्ती झाली आहे. राव यांच्याकडे सहकार आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांचीही बदली झाली आहे.

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार २००८ च्या बॅचचे अधिकारी आहेत. साखर आयुक्त म्हणून कार्यरत होते. मूळचे नांदेडचे असलेले डॉ. पुलकुंडवार यांनी यापूर्वी नाशिक महापालिकेचे आयुक्त, रस्ते विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक संचालक म्हणून काम केले आहे. २००८ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे खासगी सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले होते.