पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींना उद्या अनोखी मानवंदना

0
144

विश्व हिंदू परिषद आणि ढोल ताशा महासंघाचे आयोजन

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीवर्षानिमित्ताने संत तुकाराम नगर परिसरातील नागरिक पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अनोखी मानवंदना देणार आहेत.
विश्व हिंदू परिषद – बजरंग दल संत तुकाराम नगर प्रखंड व पिंपरी चिंचवड ढोल ताशा महासंघ यांच्या संयुक्त पुढाकाराने शनिवार दि.३१ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता शहरातील वल्लभनगर येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यालय प्रांगणात तब्बल ३०० ढोल ताशांचे वादन होणार असून, विश्व हिंदू परिषद हीरक महोत्सवी वर्ष व अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त आगळीवेगळी मानवंदना देऊन त्यांच्या अतुलनीय कार्याचा जागर केला जाणार आहे.
यावेळी परिसरातील विविध ढोल ताशा पथक, मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून या भव्य दिव्य कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींना मानवंदना देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.