केंद्रात सत्ताधारी असलेल्या नरेंद्र मोदी सरकारने महायुतीच्या माध्यमातून ‘अब की बार चार सौ पार ‘ अशी घोषणा करत राज्यात 45 लोकसभेच्या जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. महायुतीचा हा डाव उधळून लावण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील कंबर कसली आहे. पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या जागा लढविणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे मैदानात उतरणार आहेत. यासाठीचे जोरदार नियोजन केले जात आहे.
उमेदवारांच्या प्रचारार्थ पुणे शहरात प्रियांका गांधी, राहुल गांधी यांच्यासह आदित्य ठाकरे यांचा रोड शो तर उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह अन्य महत्त्वाच्या नेत्यांच्या जाहीर सभा आयोजित केल्या जाणार आहेत. पुणे जिल्ह्यात समावेश असलेल्या पुणे शहर, बारामती, शिरूर आणि मावळ या मतदार संघात महायुतीने आपले उमेदवार उतरवले आहेत.
या चार मतदार संघापैकी दोन मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे NCP उमेदवार तर एका मतदार संघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार आणि पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. यातच 18 तारखेला हे तीनही उमेदवार एकत्र अर्ज भरणार नाना पेठेत शरद पवारांच्या उ










































