पुणे शहरात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का

0
28
  • पाच माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर

पुणे, दि.02 (पीसीबी)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते असलेले उद्धव ठाकरे यांना नवीन वर्षांत जोरदार धक्का बसणार आहे. विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर उद्धव ठाकरे यांच्या पुण्यातील गडाला सुरंग लागणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. पुणे येथील पाच माजी नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सोडणार आहे. ते सर्व भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना हा मोठा झटका असणार आहे.
पालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची मोठी अडचण होणार आहे.
पुण्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. भाजपकडून हा झटका उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ५ माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. राज्य सरकार यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडणार आहे. त्यामुळे राज्यातील विविध पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चा बांधणी करण्यास लागले आहे. त्यावेळी शिवसेना उबाठाला पुण्यात धक्का बसणार आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे यांना हा मोठा धक्का समजला जात आहे.
काय आहे या नेत्यांचा आरोप

उद्धव ठाकरे यांचे पुण्यात लक्ष नाही. त्यामुळे माजी नगरसेवक अस्वस्थ झाले आहेत. त्यातील पाच जणांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व जण मुंबईत पाच जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामध्ये बाळा ओसवाल, विशाल धनवडे यांच्यासह आणखीन चार नगरसेवकांचा समावेश आह