मुंबई, दि. २९ (पीसीबी) : एकनाथ शिंदेच्या बंडाच्या नाट्यमय घडामोडींमध्ये राज्यमंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचा प्रस्ताव आणण्याची चर्चा होती. मात्र, या बैठकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी पुण्याचं नाव जिजाऊ नगर करण्याची मागणी कॅबिनेटमध्ये केली आहे. पुण्याचं नाव बदलण्याचा कोणताच विषय कॅबिनेटमध्ये नव्हता मग अचानकक काँग्रेसच्या नेत्याकडून बैठकीदरम्यान पुण्याचं नाव बदलण्याची मागणी करण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्य मंत्रीमंडळाची ही कदाचित शेवटची बैठक असल्याने नामांतराच्या मुद्यावर शिवसेना , काँग्रेस यांच्यात द्वंद्व सुरु होता.










































