पुणे मेट्रो चाकणपर्यंत आणण्याचे पुढील ध्येय – अजित पवार

0
60

चाकण, दि. १२ –
पुण्यातील चाकण येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी झालो. या कार्यक्रमात सहकारी व नागरिकांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजातील एकता, समता व बंधुता टिकवण्यासाठी आपण नेहमी एकत्र राहून लोकहित साधावे, असे आवाहन केले.

आज दिवसभरात आळंदी, खेड आणि चाकण येथे ५३६ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. राज्याच्या आर्थिक विकासासाठी ५०,००० कोटींच्या योजनांची घोषणा केली असून, पुणे मेट्रो चाकणपर्यंत आणण्याचे पुढील ध्येय आहे, ते लवकरच पूर्णत्वास आणू. कांदा निर्यातबंदी संदर्भात शेतकऱ्यांच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मी स्वतः शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम प्रयत्नशील आहे.

गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक एकतेसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची महत्त्वपूर्ण परंपरा सर्वांनी पर्यावरण पूरक पद्धतीने साजरी करावी, असे आवाहन केले. या कार्यक्रमाला खेड-आळंदी मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील, कार्यकर्ते व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.