पुणे पोलीस हफ्तेखोर, महिला पोलिसही पबमध्ये असतात, काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

0
259

“आरोपीला कोर्टात हजर केलं, तेव्हा गंभीर कलम नव्हती. मग, जज स्वत:ची चार कलम टाकून शिक्षा देणार का? पुणे पोलिसांनी तपासात चूका केल्या. पुणे पोलिसांनी पैशे घेतले. फाईव्ह स्टार ट्रीटमेंट दिली. पिझ्झा पार्टी झाली. लाल कार्पेट घालून पोलीस आरोपीला सोडण्यासाठी त्याच्या घरापर्यंत गेले होते”

“राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले. पण पुण्यातील बिल्डर लॉबी त्यांच्यावर प्रेशर टाकू शकते. हा फार्स असू शकतो. हे फक्त दाखवण्यापुरता, पुणेकरांच समाधान करण्याकरता देवेंद्र फडणवीस आले होते. या प्रकरणात तपास अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने तपास केला, त्याच्यावर आतापर्यंत कुठलीही कारवाई केली नाही हे फक्त दाखवण्यापुरता देखावा होता” असा गंभीर आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. ते पुण्यातील काँग्रेसचे नेते आहेत. पुण्यातून ते लोकसभा निवडणुकीला उभे आहेत. येत्या 4 जूनला निकाल आहे. पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावरुन महाराष्ट्रात संतापाच वातावरण आहे. पुण्यातील एका बड्या बिल्डरच्या मुलाने त्याच्या पोर्शे कराने दुचाकीला उडवलं. आता यावरुन रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. “पोलिसांनी अल्पवयीन असलेल्या आरोपीवर गंभीर कलम लावली नाहीत. त्या रात्री प्रचंड माया जमा केली” असं म्हटलं आहे.

“आरोपीला कोर्टात हजर केलं, तेव्हा गंभीर कलम नव्हती. मग, जज स्वत:ची चार कलम टाकून शिक्षा देणार का? पुणे पोलिसांनी तपासात चूका केल्या. पुणे पोलिसांनी पैशे घेतले. फाईव्ह स्टार ट्रीटमेंट दिली. पिझ्झा पार्टी झाली. लाल कार्पेट घालून पोलीस आरोपीला सोडण्यासाठी त्याच्या घरापर्यंत गेले होते” असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. मुलाला पोर्शे कार देणाऱ्या बिल्डर विशाल अग्रवालला पोलिसांनी अटक केली आहे. “हा बिल्डर पहिल्यापासून डिफॉल्टर आहे. महापालिकेकडे असलेल्या त्याच्या कामात तो डिफॉल्टर आहे. स्ट्रक्चर ऑडिट झालेलं नाही. पुणे महापालिकेला बिल्डरकडून पैसे येण बाकी आहे” असे आरोप रवींद्र धंगेकर यांनी केले. पोलीसच पब पार्टीमध्ये सामील

“अशी बिल्डर लॉबी भाजपासाठी काम करते, त्यावर आमचं काही म्हणणं नाही. पुणेकरांचा यामध्ये नाहक बळी जातोय” असं रवींद्र धंगेकर म्हणाले. कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या पबबाबत नागरिकांच्या काही तक्रारी आहेत, त्यावर धंगेकर म्हणाले की, “पब संस्कृती बंद झाली पाहिजे. पोलीस आयुक्तांनी नियमावली केली, 1.30 वाजेपर्यंत परवानगी दिली. त्यावेळी मी आक्षेप घेतला, 1.30 ची वेळ सकाळी 4-5 पर्यंत जाणार. पब आहे तिथे आरडा-ओरडा गडबड, गोंधळ चालतो” “हे हफ्तेखोर पोलीस मदत करतात. पोलिसांचे यामध्ये पैसे आहेत, ते सुद्धा भागीदार आहेत. पोलीस पब पार्टीमध्ये असतात. दु:ख म्हणजे महिला पोलीस कॉन्स्टेबलही तिथे असतात. पोलीसच असे वागत असतील तर सर्वसामन्यांना न्याय कसा मिळणार?” असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला.