पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून दरोडा, घरफोडया करणारी टोळी गजाआड

0
468

तब्बल 173 गुन्हे उघडकीस; 3 पिस्तुल, 14 जिवंत काडतुसांसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण 1 कोटी 21 लाखाचा माल जप्त

पुणे, दि. २८ (पीसीबी) – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-3, युनिट-2, खंडणी विरोधी पथक-1 आणि दरोडा व वाहन चोरी पथक-1 ने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणच्या हद्दीत दरोडे आणि घरफोडीचे गुन्हे करणार्‍या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 173 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून एकुण 1 कोटी 21 लाख 41 हजार 200 रूपयाचा ऐवज जप्त केल्याची माहिती अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी (23, रा. बहात्तर वस्ती, पाण्याच्या टाकी जवळ, मांजरी), बच्चनसिंग जोगींदरसिंग भोंड (25, रा. गोसावी वस्ती, बिराजदार नगर, श्री साई सोसायटी समोर, लेन नं. 7, वैदवाडी, पुणे), रामजितसिंग रणजितसिंग टाक (रा. रामनगर, हडपसर), राहुलसिंग रविंद्रसिंग भोंड (रा. हडपसर), कणवरसिंग काळूसिंग टाक (रा. हडपसर), लखनसिंग राजपूतसिंग दुधाणी (रा. रामटेकडी, हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तिकलसिंग गब्बरसिंग टाक (रा. रामटेकडी, हडपसर), अक्षयसिंग विहसिंग टाक (रा. हडपसर), करणसिंग रजपूतसिंग दुधाणी (रा. हडपसर), सोहेल जादेव शेख (रा. गोसावी वस्ती, हडपसर) आणि महेंद्रसिंग (रा. बीड) हे फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-3 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, खंडणी विरोधी पथक-1 चे वरिष्ठ निरीक्षक अजय वाघमारे, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-1 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार, अजितकुमार पाटील, राजेंद्र पाटोळे, विकास जाधव, शाहीद शेख तसेच पोलिस अंमलदार संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे, उत्तम तारू, गणेश ढगे, संजय भापकर, सयाजी चव्हाण, किरण ठवरे, दुर्योधन गुरव,संभाजी गंगावणे, किरण पवार, संजिव कळंबे, सुरेंद्र साबळे, सुजीत पवार, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे, साई कारके, दिपक क्षीरसागर, राकेश टेकावडे, सतीश कत्राळे, प्रकाश कट्टे, निखिल जाधव, साईनाथ पाटील, प्रताप पडवाळ, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.