पुणे पोलिसांची मोठी कामगिरी ! गाड्यांच्या काचा फोडून लॅपटॉप, रोख रक्कम चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

0
44

पुणे, दि. 16 (पीसीबी) : स्त्याचे कडेला पार्क करण्यात आलेल्या गाडीच्या काचा फोडून गाडीचे नुकसान करत लॅपटॉप, रोख रक्कम चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद करण्यात स्वारगेट पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी सुरेश कुमार पांडुरंगन सेरवई (वय ५०,रा. रामजीनगर पुंगनूर, ता. श्रिरंगम, जि. त्रिचापल्ली, तमिळनाडू) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने त्याचा साथीदार सेंथील कुमार महालिंगन (वय ४०) याच्यासह पुणे शहरात वेगवेगळया पोलीस स्टेशन हद्दीत एकूण ११ वाहनांच्या काचा फोडून ११ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली आहे.

याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल असून सदर तक्रारदार यांची फॉर्च्युनर गाडी रस्त्याचे कडेला पार्क करुन लॉक केली असताना, अनोळखी व्यक्तीने गाडीची काच फोडून लॅपटॉप आणि अ‍ॅपल कंपनीचा इअर पॉड असलेली बँग पळवून नेली होती. याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी सदर गुन्ह्यातील लॅपटॉपचा शोध घेतला असता, सदरच्या लॅपटॉपचे लोकेशन बंगळूरू येथे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी बंगळूरु पोलिसांशी संर्पक करुन सदर व्यक्तीस ताब्यात घेण्यास सांगितले.

त्यानुसार तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस अंमलदार फिरोज शेख आणि सुजय पवार यांचे पथे बंगळूरु येथे रवाना झाले. त्यांनी आरोपी सुरेशकुमार सेरवई यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून गुन्हयातील दीड लाख रुपये किंमतीचे अ‍ॅपल इअर पॉड आणि डेल कंपनीचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. पुण्यात स्वारगेट, खडक, चंदननगर, डेक्कन, येरवडा परिसरात त्यांनी अशाप्रकारे चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर यापूर्वी मुंबईत तीन गुन्हे दाखल आहेत.