पुणे-पिंपरी डिजीटल मिडिया Editors Guild ची स्थापना,अध्यक्ष नितीन पाटील

0
227
  • उपाध्यक्षपदी अविनाश चिलेकर, विवेक इनामदार

पुणे, दि. ६ (पीसीबी): डिजीटल मिडिया सध्या आणि आगामी काळात प्रसार माध्यमांचे मुख्यकाम करणार आहे. समाज माध्यमांवर डिजीटल मिडियाचा सर्वाधिक प्रभाव राहणार असल्यामुळे डिजीटल मिडियाला सध्याच्या काळात अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणार्‍या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारांनी पुणे-पिंपरी डिजीटल मिडियाच्या Editors Guild ची स्थापना केली आहे. Editors Guild ची पहिली बैठक नुकतीच पुण्यात पार पडली.

ही बैठक Editors Guild चे संस्थापक अध्यक्ष नितीन पाटील (संपादक – policenama.com ) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीस mpcnews.in चे संस्थापक संचालक विवेक इनामदार, PCBtoday चे संपादक अविनाश चिलेकर,
punekarnews.in चे संपादक मुबारक अन्सारी, Consulting Editor टिकम शेखावत,mypunepulse.com च्या संपादिका रेणुका सुर्यवंशी आणि thescoope.in च्या संपादिका आणि कार्यकारी संचालक अर्चना मोरे उपस्थित होत्या. बैठकीमध्ये Editors Guild च्या पुढील वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली.

डिजीटल मिडियामध्ये काम करणार्‍या पत्रकारांना एकत्रित आणण्यासाठी तसेच त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी Editors Guild ही संघटना काम करणार आहे. ही संघटना स्थापन करण्यामागे टिकम शेखावत यांचा मोलाचा वाटा आहे.

Editors Guild ची कार्यकारणी –

संस्थापक अध्यक्ष – नितीन पाटील
कार्यकारी अध्यक्ष – मुबारक अन्सारी
सरचिटणीस – टिकम शेखावत
वरिष्ठ उपाध्यक्ष – विवेक इनामदार
वरिष्ठ उपाध्यक्ष – अविनाश चिलेकर
चिटणीस – रेणुका सुर्यवंशी
खजिनदार – अर्चना मोरे
कार्यकारणी सदस्य – बासित शेख