पुणे, पिंपरी – चिंचवडला पावसाने झोडपले

0
2

दि.०२(पीसीबी)-पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील बहुतांश भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू असून, रस्त्यांवर अक्षरशः पाणी वाहताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. पुण्यात आज दुपारी आलेल्या पावसामुळं रस्त्यांवरुन पाणी वाहताना दिसून येत आहे. पुण्यात पावासमुळं भरदिवसा अंधाराची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळं काही वाहनचालकांनी वाहनांच्या हेडलाईट सुरु केल्याचं पाहायला मिळालं आहे.

सध्या उन्हाळ्याचा काळ असल्याने बहुतांश नागरिक छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवत नाहीत. मात्र अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पुण्यातील हा पाऊस केवळ शहरापुरताच मर्यादित नसून ग्रामीण भागातही जोरदार पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याचीही माहिती समोर येत आहे. पुण्यात जवळपास एक तासांहून अधिक काळ मुसळधार पाऊस पडला. पुण्यात मुसळधार पाऊस सुरु असून ग्रामीण भागात गारपीट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पुण्याला अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं त्याचा परिणाम वाहतुकीवर देखील दिसून येत आहे.

चिंचवड, वाकड, थेरगाव, रावेत आणि नंतर निगडी, आकुर्डी, पिंपरी, परिसरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. आकाश पुरते काळवंडलेले आणि सर्वच रस्ते जलमय झाले होते. पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे पुणे च्या सर्व उपनगरात व पिंपरी चिंचवड परिसरात तसेच दोन्ही महापालिका क्षेत्रामध्ये वीस ते पंचवीस मिनिटापूर्वी वादळी वाऱ्यांसह पावसाची सुरुवात झालेली आहे आतापर्यंत साधारणपणे २५ एम एम पाऊस नोंदला गेला आहे आणि वाऱ्याचा वेग 28 ते 35 किलोमीटर प्रति तास आहे तरी सर्व आपात यंत्रणा सतर्क व्हावी व सर्व लोकांनी काळजी घ्यावी अकारण बाहेर पडू नये झाडे पडण्याची शक्यता व वाहतूक कोंडी ची शक्यता आहे