पुणे-नाशिक रेल्वे कामाला अखेर आरंभ, २,५०० कोटींचा निधी मंजूर

0
413

पुणे, दि. ४ (पीसीबी) – पुणे आणि नाशिक ही दोन महत्वाची शहरे अजूनही रेल्वेने जोडली गेली नाही. ही शहरे रेल्वे जोडण्याचा प्रस्ताव तयार केला गेला आहे. महारेलकडून या मार्गावर सेमीहायस्पीड ट्रेनचे काम सुरु केले आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. आता या प्रकरणात आणखी एक महत्वाचे अपडेट आले आहे. नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी 2500 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. यामुळे नाशिक – पुणे रेल्वे मार्ग उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

काय आहे रेल्वेमार्गासंदर्भात अपडेट
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा प्रस्ताव मध्य रेल्वे बोर्डाकडे दिला गेला होता. परंतु त्यात काही त्रुटी होत्या. त्या त्रुटींचे निवारण करण्यात आले. त्यानंतर पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा अंतिम आराखडा तयार झाला. आता या मार्गासाठी निधीची सर्वात मोठी अडचण होती. नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी 2500 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. रेल्वे मंडळाकडून निधीला मान्यता मिळाली आहे. 60 टक्के इक्विटीतून हा निधी मिळणार आहे. यामुळे आता नाशिक – पुणे रेल्वे मार्ग उभारणीचा मार्ग मोकळा झाला.

235 किलोमीटरचा रेल्वे मार्ग
नाशिक पुणे रेल्वेसाठी केंद्र आणि राज्य शासनाने यापूर्वीच दिली आहे. दोन शहरांना जोडणारा 235 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे. या मार्गावरुन सेमी हायस्पीड रेल्वे जाणार आहे. हा मार्ग तयार करण्याची जबाबदारी महारेलला देण्यात आली आहे. या रेल्वे मार्गासाठी रेल्वे रुळ टाकणे आणि रेल्वे स्टेशन उभारण्यासाठी जमीन संपादन करण्याचे काम सुरु केले आहे. नाशिकमधील सिन्नर तालुक्यातून भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नाशिक पुणे रेल्वे मार्ग 235 किलोमीटर आहे. या मार्गावर 18 बोगदे असणार आहे. तसेच 19 उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येणार आहे. 200 किलोमीटर प्रतितास वेगाने सेमीहायस्पीड रेल्वे या मार्गावरुन धावणार आहे. हा मार्ग सुरुवातीपासून संपूर्ण विद्युतीकरण झालेला असणार आहे. या मार्गावरुन पहिल्या टप्प्यात 6 कोचची रेल्वे धावणार आहे. त्यानंतर 12 ते 16 कोचची रेल्वे धावणार आहे. मार्गावर एकूण 20 स्टेशन असणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर पुणे-नाशिक पाच ते सहा तासांचा प्रवास अवघ्या 1 तास 45 मिनिटांत पूर्ण होणार आहे.