पुणे नाशिक महामार्गावर भरधाव वाहनाने तरुणास उडवले

0
681

भोसरी, दि. २४ (पीसीबी) – पुणे नाशिक महामार्गावर कुरळी येथे भरधाव वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या एका तरुणाला धडक दिली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर वाहन चालक पळून गेला ही घटना शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.

अभिजीत मूरताजी काळेवाड (रा. चाकण. मूळ रा. नांदेड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गोपीराज चंपतराव पवार (वय 31, रा. नांदेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत काळेवाड शुक्रवारी सायंकाळी कुरळी येथे सोनवणे वस्ती फाट्याजवळ पुणे-नाशिक महामार्ग ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता, अभिजीत यांना रुग्णालयात दाखल न करता तसेच पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.