पुणे-नाशिक महामार्गावर दुचाकीला डंपरची धडक; आई आणि मुलगा गंभीर जखमी

0
99

मोशी, दि. २८ (पीसीबी) : पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे भरधाव डंपरने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात 24 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडला.

शाहीन शेख (वय 41), आतिक शेख (वय 21) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी अकबर हुसेन शेख (वय 45, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर (एमएच 14/एलबी 4347) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नी शाहीन आणि मोठा मुलगा अधिक हे त्यांच्या दुचाकीवरून जय गणेश साम्राज्य चौकाकडून काजळे पेट्रोल पंप मोशीकडे जात होते. काजळे पेट्रोल पंप मोशी येथून भोसरीकडे जाण्यासाठी युटर्न घेत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये फिर्यादी यांची पत्नी आणि मोठा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर डंपर चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.