दि. 6 (पीसीबी) – पुणे-नाशिक महामार्गावर एका कारने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील तिघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि. ५) सकाळी चाकण येथे घडला.
याप्रकरणी ४६ वर्षीय जखमी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचे पती आणि मुलगा दुचाकीवरून जात होते. पुणे-नाशिक महामार्गावर चाकण मधील एकता नगर येथे आल्यानंतर एका कारने फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये फिर्यादी, त्यांचे पती आणि मुलगा रस्त्यावर पडले. त्यात तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.