पुणे जिल्हा मुस्लिम शिकलगार समाज सेवा संघाकडून काश्मीरमधील भ्याड हल्ल्याचा निषेध

0
4

दि . २५ ( पीसीबी ) – पुणे जिल्हा मुस्लिम शिकलगार समाज सेवा संघ काश्मीरमधील अलीकडील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करीत आहे. मुस्लिम शिकलगार समाज नेहमीच देशाशी आणि महाराष्ट्र राज्याशी एकनिष्ठ राहिला आहे. या क्रूर कृत्यामुळे अनेक निरपराध नागरिक आणि आपले शूर बंधू शहीद झाले असून, या घटनेमुळे आम्हाला तीव्र दुख: आणि संताप झाला आहे.

आम्ही या हल्ल्यात शहीद झालेल्या बंधूंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना गहिर्‍या संवेदना व्यक्त करतो. या दुख:दायी प्रसंगी आम्ही शहीदांच्या कुटुंबियांच्या आणि जखमींच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.

या दुखद प्रसंगी, सर्व उपस्थितांनी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दोन मिनिटांचे मौन पाळले.

आम्ही सरकार आणि प्रशासनाला विनंती करतो की, या हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींना कठोरातिकठोर शिक्षा द्यावी.

या प्रसंगी.अध्यक्ष सलिमभाई, कार्याध्यक्ष नझीरभाई, दाऊदभाई सचिव आसिफभाई, PRO जमीरभाई, हलीमा आप्पा, नसीम आप्पा, रिनाज आप्पा आणि संघटनेचे इतर सदस्य उपस्थित होते.