पुणे अपघात प्रकरणी सर्वात मोठा ट्विस्ट

0
156

पुण्यातील कल्याणीनगर येथे रविवारी पहाटे 3.15 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला होता. पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलानं भरधाव वेगानं चालवलेल्या पोर्शे कारनं दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुण-तरुणीला चिरडलं. या अपघातात दुचाकीवरुन जाणाऱ्या इंजिनिअर तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. पुणे अपघात प्रकरण आता संपूर्ण देशभरात चर्चेत आहे. याप्रकरणी सध्या नवनवीन खुलासे समोर येत आहे. याप्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. आता या प्रकरणी सर्वात मोठा ट्विस्ट आला आहे. अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या वडिलांनी अपघातावेळी गाडी ड्रायव्हर चालवत असल्याचा दावा केला. यामुळे एकच खळबळ माजली आहे.

अपघात झाला त्यावेळी मी नाही, तर आमचा ड्रायव्हर गाडी चालवत होता, असा दावा अल्पवयीन आरोपी आणि त्याच्यासोबत गाडीत असलेल्या त्याच्या दोन मित्रांनी केला आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी हा दावा केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, आरोपीचा वडील बिल्डर विशाल अग्रवालनं देखील त्याच्या जबाबात असाच दावा केल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे दुर्घटननेप्रकरणी विशाल अग्रवालची सध्या चौकशी सुरू आहे. दुर्घटनेच्या वेळेसे त्याचा फॅमिली ड्रायव्हर हा कार चालवत होता, असं त्याने पोलिसांना सांगितलं. त्या अल्पवयीन मुलाच्या मित्रांनीही हाच जबाब दिला आहे. आता या प्रकरणात नवे अपडेट आले आहेत की ज्या फॅमिली ड्रायव्हरने कार चालवल्याचे सांगितले जात होते, त्याची पोलिसांनी गुरूवारी पुन्हा चौकशी केली.

या फॅमिली ड्रायव्हरने आधीच्या जबाबात असा दावा केला होचा की दुर्घटना घडली तेव्हा तोच कार चालवत होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान देखील या ड्रायव्हरने हीच गोष्ट कबूल केली आहे. तर अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनीही असाच दावा केला की त्यांनी नियुक्त केलेला ड्रायव्हरच पोर्शे कार चालवत होता. दोघांच्या वक्तव्यानंतर बापलेकाची जोडगोळी पोलिसांना भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र पार्टीनंतर पबमधून बाहेर आल्यानंतर कार चालवण्याच्या अवस्थेत नसल्याचं पाहून ड्रायव्हरनं विशाल अग्रवालला फोन केला. त्याला गाडी चालवू देत, असं विशाल अग्रवालनं स्वतः सांगितल्याचा दावा ड्रायव्हरनं याआधी केला आहे.