पुणेकर शिंदेवर नाराज ?

0
349

पुणे, दि. ३ (पीसीबी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यात मंगळवारी शिंदे हे पुण्यात होते. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून त्यांचा पुण्यातील हा पहिला दौरा होता. यात पुण्यातील अनेक प्रश्नांवर चर्चा होईल आणि प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा पुणेकरांना होती. मात्र शिंदेवर पुणेकर नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

पुणे विभागाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी एका वाक्यात उत्तरे दिली. त्यामुळे पुणेकरांची निराशा वाढल्याच्या चर्चा आहेत. देवेंद्र फडणवीस हे पुण्याच्या प्रश्नांबाबत विशेष लक्ष देत असे, परंतु शिंदेंचा हा दौरा पुणेकरांची नाराजी वाढविणारा ठरला असं म्हटलं जात आहे.

पुर्वी लोकसंख्येनुसार पुण्यात पाणीपुरवठा केला जात असे. परंतु लोकसंख्या वाढली असली तरी त्याच प्रमाणात पाणीपुरवठा केला जात आहे? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, ही बाब आपण तपासून पाहू, संबधित विभागाला तसे निर्देश देऊ असं थोडक्यात उत्तर शिंदेंनी दिल्याने, त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान सर्वच प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात दिल्याने पुणेकर शिंदेवंर नाराज आहेत.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या शिंदेंच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवरवर चर्चा झाली. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. रस्त्यावरील खड्डे भरताना केवळ तात्पुरती कामे न करता तंत्रज्ञाचा वापर करावा, असे निर्देश शिंदेंनी दिले. पीेएमआरडीएतील वाहतूक आराखड्याबाबत मुंबईत एक बैठक आयोजित केली जाईल, असेही शिंदेंनी सांगितले आहे.