पुजा खेडकरची आई मनोरमा खेडकरकडून पोलीस तपासात अडथळा आणि अपहरणकर्ता आरोपींना लपवण्याचा प्रयत्न !

0
1

दि. १५(पीसीबी)-रबाळे येथून अपहरण झालेल्या व्यक्तीचा तपास करताना, पोलिसांना पुणे, येथील घरामध्ये मध्ये आरोपी व गुन्ह्यातील लॅन्डक्रुझर कार (MH 12 RP 5000) असल्याचे स्पष्ट पुरावे मिळाले.परंतु घरमालकीण मनोरमा दिलीप खेडकर हिने पोलिसांना घरात प्रवेश नाकारला, गेट बंद करून सरकारी कामात अडथळा आणला, आरोपी आणि गुन्ह्यातले पुरावे (कार) लपवली आणि भितीदायक कुत्रे सोडून पोलिसांना धमकावले!

मनोरमा खेडकर हिने गुन्ह्यातील कार व आरोपींना घेउन पोलिस स्टेशनला यायचे कबूल केले परंतू गेलेच नाहीत. त्यानंतर हजर रगाण्याबाबत पोलिसांनी खेडकर यांच्या दारावर नोटीस चिकटवली आहे.ज्याअर्थी आरोपींना लपवण्यासाठी इतकी जोखीम घेतलीय त्याअर्थी अपहरणकर्ते कारचालक कोणी कर्मचारी नव्हे तर कुटुंबियांपैकी पुरूष असणार हे उघड आहे.