पीसीईटीच्या समृद्धी शिंदे यांची वर्ल्ड गेम आणि नॅशनल गेम साठी निवड

0
198

पिंपरी,दि. २१ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन ची विद्यार्थिनी समृद्धी शिंदे हिची रोलर स्पीड स्केटिंग या खेळासाठी वर्ल्ड गेम्स 2022 आणि नॅशनल गेम्स 2022 साठी निवड झाली आहे. समृद्धी शिंदे ही नॅशनल गेम मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे तर अर्जेंटिना येथे होणाऱ्या वर्ल्ड गेम 2022 मध्ये ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईनचे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे यांनी समृद्धी शिंदे हीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील कार्यास तिला शुभेच्छा दिल्या.