पीसीईटीच्या रेडिओ स्टुडिओच्या उद्घाटन पीसीईटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

0
217

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रेडिओ स्टुडिओचे उद्घाटन पीसीटीच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या कम्युनिटी रेडिओ इन्फिनिटी ९०.४ एफ.एम. हे अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असे आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टही शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. केजी टू पीएचडी दर्जेदार शिक्षण देणारी समाजासाठी विद्यार्थ्यांच्या सुसंस्कृत पिढ्या घडवणारी ही संस्था विद्यापीठाची मेरिट लिस्ट असो, स्पर्धा परीक्षा असो, कला, क्रीडा, साहित्य स्पर्धा असो, नवनिर्माण असो, संशोधन असो सगळ्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे असे संस्थेच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले.

या रेडिओ स्टुडिओची सेवा पिंपरी चिंचवड शहरासह संपूर्ण पुणे जिल्ह्याला सामावून घेणारी असेल. यावेळी पी सी ई टी चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ गिरीश देसाई, सर्व महाविद्यालयाचे कॉलेजेसचे संचालक, प्राचार्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी कम्युनिटी रेडिओचे कार्यक्रम निर्माते महेश जगताप, करिअर मार्गदर्शक विजय नवले आदी उपस्थित होते. यावेळी रेडिओचे प्रोग्राम असिस्टंट विराज सवाई यांनी स्वागत केले. प्राॅडक्शन मॅनेजर माधुरी ढमाले यांनी प्रास्ताविक केले.

शैक्षणिक संस्थांच्या स्पर्धेत अग्रेसर ठरण्यासाठी आणि वैयक्तिक संस्थेबरोबरच आपल्या आजूबाजूच्या समाजाचा विकास व्हावा या व्यापक उद्देशाने या कम्युनिटी रेडिओची स्थापना करण्यात आलेली आहे. समाजाने समाजासाठी चालविलेला हा रेडिओ प्रत्येकाला आपल्या कलागुणांना तपासून पाहण्याचा आणि ते कलागुण सादर करण्याचा अनुभव देण्यासाठी सज्ज झालेला आहे. संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापकांसह संस्थेची संबंधित प्रत्येक व्यक्ती या रेडिओच्या कार्यक्रम निर्मितीमध्ये सहभागी होऊ शकते. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड आणि परिसरातील तळागाळातील भागांपर्यंत शिक्षण पोहचवणे आणि तिथे व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी प्रयत्न करणे दोन्ही पातळीवर हा कम्युनिटी मिनिटी रेडिओ सक्रिय असणार आहे.

या रेडिओचे शीर्षक करणा-या अभिषेक बंगाळे या विद्यार्थ्याचा विशेष सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. समीर सावरकर यांनी केले.