पीडीएफ फाईल ओपन करताच गमावले 45 हजार रुपये

0
174

सांगवी, १८ जुलै (पीसीबी) -एका महिलेने व्हाट्सअँपवर आलेली एक पीडीएफ फाईल ओपन केली असता तिच्या बँक खात्यातून 45 हजार रुपये अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर ट्रान्सफर झाले. ही घटना 14 जुलै रोजी नवी सांगवी येथे घडली.याप्रकरणी 48 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला तिच्या व्हाटस अपवर अनोळखी नंबरवरून एक पीडीएफ फाईल आली. ती फाईल फिर्यादीने ओपन केली असता फिर्यादीच्या बँक खात्यातून 36 हजार रुपये आणि युपीआय द्वारे 9 हजार 500 रुपये अनोळखी बँक खात्यावर ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.