पीओके अर्थात पाकव्याप्त काश्मीर भारतातच भाग, तेथील २४ विधानसभेच्या जागा आरक्षित – अमित शाह

0
223

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – पीओके अर्थात पाकव्याप्त काश्मीर हा भारतातच भाग असून तेथील २४ विधानसभेच्या जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.

लोकसभेमध्ये जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचना दुरुस्ती विधेयकावर चर्चा झाली. सुरुवातीला जम्मूमध्ये ३७ जागा होत्या, आता त्या ४३ झाल्या आहेत. काश्मीरमध्ये पहिल्यांदा ४६ जागा होत्या आता ४७ आहेत. तसेच POK मधील २४ जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत, कारण पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे; असं स्पष्टीकरण अमित शाहांनी लोकसभेत दिलं.

लोकसभेत सुरु असलेल्या नवीन विधेयकावरील चर्चेमध्ये आकडेवारी मांडून अमित शाहांनी परिस्थितीची जाणीवर करुन दिली. ते म्हणाले, भारत-पाकिस्तानच्या पहिल्या युद्धानंतर २६ हजार कुटुंब जम्मू आणि काश्मीमरध्ये स्थायिक झाले होते. तर ५ हजार कुटुंब देशभरात स्थायिक झाले. नवीन विधेयकानुसार काश्मीरमधून विस्थापित गटातून २ सदस्य आणि पीओकेमधून एक नामनिर्देशित सदस्य प्रतिनिधी म्हणून निवडला जाणार आहे.

या विधेयकामुळे स्वातंत्र्यानंतर अन्याय झालेल्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. विस्थापितांना सन्मान, नेतृत्व बहाल करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून सर्वांनी सहमतीने विधेयकाच्या बाजूने मतप्रदर्शन केल्याने गृहमंत्र्यांनी आभार मानले.