पीएम नरेंद्र मोदी जगात अव्वल, जो बायडन, ऋषी सुनक यांनाही टाकले मागे

0
231

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवडले गेले आहेत. मॉर्निंग कन्सल्टच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आलेल्या यादीत पीएम मोदी 78 टक्के जागतिक नेत्यांच्या मान्यता रेटिंगसह अव्वल स्थानावर आहेत.

पीएम मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह 16 देशांच्या दिग्गज नेत्यांना मागं सोडलंय. पंतप्रधान मोदींना जगभरातील नेत्यांमध्ये सर्वोच्च रेटिंग मिळालंय. या यादीत मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांना 68 टक्के रेटिंग मिळालंय. तर, तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पीएम अल्बानीज आहेत, ज्यांचं रेटिंग 58 टक्के आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी चौथ्या क्रमांकावर आहेत. मेलोनीचं रेटिंग 52 टक्के आहे.

‘मॉर्निंग कन्सल्ट’चं हे रेटिंग 26 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यानचं आहे. या यादीत ब्राझीलचे राष्ट्रपती लुला डी सिल्वा या यादीत 50 टक्के रेटिंगसह 5 व्या क्रमांकावर आहेत. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांची रेटिंग 40 टक्के आहे. त्यांच्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचं नाव येतं. त्यांची रेटिंग 40 टक्के आहे.