पीएमपी बस प्रवासात महिलेची एक लाखाची बांगडी पळवली

0
242

निगडी, दि. १७ (पीसीबी) – पीएमपी बसमधून प्रवास करताना अज्ञाताने प्रवासी महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. १४) दुपारी पावणे एक ते दीड वाजताच्या कालावधीत चिखली ते निगडी दरम्यान घडली.

याप्रकरणी प्रवासी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला गुरुवारी दुपारी चिखली ते निगडी असा पीएमपी बसमधून प्रवास करत होत्या. प्रवासात अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या हातातील ९७ हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या नकळत चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.