पीएमपी बस प्रवासात महिलेचा लॅपटॉप चोरीला

0
266

थेरगाव,दि.०५(पीसीबी) – पीएमपी बसने प्रवास करत असताना महिलेचा लॅपटॉप आणि इतर साहित्य अज्ञातांनी चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 4) सकाळी मनपा ते थेरगाव या मार्गावर घडली.

याप्रकरणी महिलेने अज्ञाताच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सोमवारी सकाळी साडेदहा वाजता मनपा येथून लक्ष्मणनगर थेरगाव येथे जाण्यासाठी निघाल्या. त्या सकाळी सव्वा अकरा वाजता लक्ष्मणनगर, थेरगाव येथे पोहोचल्या. बसमधून उतरताना त्यांचा लॅपटॉप आणि इतर साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. बसमधून प्रवास करताना अज्ञात चोरट्याने महिलेचा लॅपटॉप, चार्जर, माउस, एअरटेल कंपनीचे डेटाकार्ड असा एकूण 45 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.