पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
554

मोशी, दि. ०६ (पीसीबी) – पीएमपी बसने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 5) पहाटे सव्वा दोन वाजताच्या सुमारास देहू रस्ता मोशी येथे घडला.

उस्मान मुस्ताक अली खान (वय 21) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी निजाम जन्नन खान (वय 35, रा. जाधववाडी, चिखली) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस चालक नामदेव मंचकराव केंद्रे (वय 28, रा. आळंदी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मान मुस्ताक अली खान हा फिर्यादी यांच्या दुकानात काम करत होता. तो मंगळवारी पहाटे सव्वा दोन वाजताच्या सुमारास देहूरस्ता मोशी येथून दुचाकीवरून घरी जात होता. त्यावेळी नामदेव केंद्रे यांनी त्याच्या ताब्यातील पीएमपी बस (एमएच 12/केक्यू 0205) भरधाव चालवून दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार उस्मान याचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.