पीएमपी प्रवासात वृद्धाची सोनसाखळी पळवली

0
290

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पीएमपी बसने प्रवास करत असलेल्या वृद्धाची सोन्याची साखळी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. १९) सकाळी काळभोरनगर बस स्टॉपच्या आसपास घडली.

कल्याण दत्तात्रय जोशी (वय ७९) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास निगडी ते वल्लभनगर या मार्गावरून पीएमपी बसने प्रवास करीत होते. काळभोरनगर बस स्टॉपच्या आसपास तीन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची १८ ग्रॅम वजनाची सोनसाखळी गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.