पीएमपी ची बस आता थेट भीमाशंकर पर्यंत

0
379

पुणे, दि. २ (पीसीबी) : श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे दर्शनासाठी भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन पीएमपीच्या वतीने चोवीस तास शटल सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवारी आणि सोमवारी ही सेवा चोवीस तास सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या सेवेसाठी पीएमपीच्या निगडी आगारातील डिझेलवर धावणाऱ्या १२ मिडी गाड्या (मध्यम आसन क्षमता) उपलब्ध करून देण्या आल्या आहेत. दरम्यान, १४ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या कालावधीत सलग सुट्ट्या असल्याने रविवार, सोमवार आणि मंगळवारीही शटल सेवा सुरू राहिल, असे पीएमपीच्या वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले. निगडी आगारातून श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवारी पहाटे चार वाजता पहिली गाडी सुटणार आहे. गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी ब्रेकडाऊन व्हॅनही उपलब्ध करून देण्यात आली आहे.