पीएमपीच्या चऱ्होली डेपोला इ डेपो बनविण्याचे काम सुमारे ८० टक्के पूर्ण

0
437

पुणे, दि. ८ (पीसीबी) : पीएमपीच्या चऱ्होली डेपोला इ डेपो बनविण्याचे काम सुरु आहे. सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित २० टक्के काम येत्या दीड ते दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे. सध्या या डेपोचे बांधकाम सह चार्जर लावण्याचे काम सुरु आहे. इ डेपोसाठी आवश्यक असणाऱ्या विद्युत पुरवठ्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यासाठी पीएमपीचा पाठपुरावा सुरूच आहे. दोन महिन्यांत चऱ्होलीचा इ डेपो वापरात येणार आहे. ७० इ बस येथून धावतील.

पीएमपीच्या ताफ्यात इ बसची संख्या जशी वाढत आहे. त्या प्रमाणात इ डेपोची संख्या देखील वाढत आहे. चऱ्होली डेपोच्या निमित्ताने पीएमपीचा हा सहावा इ डेपो होत आहे. या पूर्वी भेकराई नगर, निगडी, बाणेर, वाघोली, पुणे स्टेशन हे इ डेपो झाले आहेत. चऱ्होली ला इ डेपो झाल्यामुळे आळंदीहून सुटणाऱ्या प्रवाशांना इ बस मधून प्रवास करता येणार आहे.

आळंदी, धानोरी, लोहगाव, हडपसर, पुणे स्टेशन आदी भागासाठी चऱ्होलीहून बस सुटते. या डेपोतून ७० बस धावतील. बस चार्ज होण्यासाठी किमान चार तास लागतात. त्यामुळे ७० बस चार्ज होण्यासाठी ३५ चार्जर बसविले जात आहे. येत्या १५ दिवसांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.