पीएमपीएमएल बस वाहकास मारहाण

0
331

वाकड, दि. २८ (पीसीबी) – वाकड मधील 16 नंबर बस थांबा ते काळेवाडी फाटा दरम्यान एकाने पीएमपीएमएल बसच्या वाहकाला चालू बसमध्ये मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 26) रात्री घडली.

मनोज भानुदास इंगवले (वय 42, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वप्नील गुणवंतराव चीमिगावे (वय 28, रा. काळेवाडी फाटा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पीएमपीएमएलच्या कोथरूड डेपोत वाहक म्हणून कार्यरत आहेत. ते मंगळवारी रात्री चिंचवडगाव ते वारजे माळवाडी या बसमध्ये कर्तव्य बजावत असताना आरोपी आरडाओरडा करत बेल वाजवत आला. ‘तुम्हाला बस थांबवता येत नाही का असे म्हणून त्याने फिर्यादींना धक्काबुक्की करून हाताने मारहाण केली. फिर्यादी करत असलेल्या शासकीय कामात आरोपीने अडथळा निर्माण केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.