पीएमपीएमएल बस प्रवासात महिलेची सोन्याची पाटली पळवली

0
335

निगडी, दि. ८ (पीसीबी) – पीएमपीएमएल बस प्रवासात प्रवासी महिलेची एक लाख रुपये किमतीची सोन्याची पाटली चोरट्याने पळवली. ही घटना मंगळवारी (दि. 5) दुपारी दोन वाजता निगडी ते आळंदी बस प्रवासात घडली.

याप्रकरणी महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मंगळवारी दुपारी दोन वाजता निगडी ते आळंदी देवाची या दरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करत होत्या. बसमध्ये चढताना अज्ञाताने फिर्यादी यांच्या हातातील एक लाख रुपये किमतीची सोन्याची पाटली चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.