पीएमटी बस मधून महिलेच्या गळ्यातील दीड लाखांचे मंगळसूत्र चोरीला

0
495

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – पीएमटी बस मधून प्रवास करत असताना महिलेच्या गळ्यातून दीड लाख रुपयांचे मंगळसूत्र चोरांनी चोरले आहे हा प्रकार बुधवारी (दि.23) मोरवाडी ते काळभोर नगर चिंचवड या मार्गावर घडला.

याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पीएमटी बस मधून मोरवाडी चौक पिंपरी ते काळभोर नगर जयश्री टॉकीज बस स्टॉप दरम्यान प्रवास करत होत्या यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की त्यांच्या गळ्यातील एक लाख साठ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरांनी गर्दीचा फायदा घेत चोरले आहे त्यानुसार पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पिंपरी पोलीस चोराचा शोध घेत आहेत.