पिंपरी, दि. ५ (पीसीबी) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) भोसरी सेक्टर क्रमांक १२ मधील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृह संकुल उभारले आहेत. या ठिकाणी नागरिक राहायला येऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. मात्र, अद्याप मूलभूत सुविधा पासून वंचित रहावे लागत आहे. तक्रारी वाढल्यानंतर आयुक्त राहुल महिवाल यांनी पाहणी करून चमकोगिरी केली. प्रत्यक्षात ४८ तास उलटूनही एकाही तक्रारीचे निरसन झाले नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचा लवाजमा घेऊन केवळ देखावा केल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.
सेक्टर क्रमांक १२ मध्ये नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे नागरिक त्रासले आहेत याबाबत पाच महिन्यांपूर्वी आयुक्तांकडे नागरिकांनी १६ प्रमुख तक्रारी लेखी निवेदनाद्वारे दिल्या होत्या. मात्र, त्यावर कोणती कारवाई झाली नाही. अखेर,नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही तक्रारी केल्या. तसेच, पीएमआरडीए कार्यावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही दिला होता. नागरिकांच्या तक्रारी वाढत गेल्याने अखेर आयुक्तांनी अधिकाऱ्यांचा लावा जमा घेऊन तेथे आले. त्यांनी यांनी पाहणी केली. या वेळी सुमारे २५० ते ३०० प्रकल्पातील रहिवाशांनी एकत्र येत आयुक्तांना घेराव घालून आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. तर, कोणत्या समस्या आहेत हे देखील त्यांच्या नि दर्शनास आणून दिल्या. यावेळी मुख्य अभियंता अशोक भालकर, कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर आदी उपस्थित होते. यावेळी रहिवाशांच्या तक्रारी सोडवू, असे आश्वासन महिवाल यांनी दिले.
पाण्याची ठीक ठिकाणी गळती ते पाणी सदनिकांमध्ये झिरपते आहे. सोसायटीचे रजिस्ट्रेशन अद्याप झाले नाही. सदनिकांच्या खिडक्या व्यवस्थित नाहीत. त्या निसटून खाली पडण्याचा धोका आहे. सोलर चे काम अपूर्ण असून, पाईप तुटणे व अन्य समस्या वारंवार घडतात. खेळाचे मैदान सपाटीकरण अभावी खेळण्याजोगे नाहीच. एलआयजी व इडब्ल्यूएस एकाच क्लस्टरमध्ये घेतल्याची तक्रार आहे. घरगुती गॅस जोडणी पाईपलाईनचे काम रखडले आहे.
सेक्टर 12 येथील प्रकल्पात वेगवेगळ्या क्लस्टर मध्ये जवळपास सातशे ते साडेसातशे घर आहेत. मात्र या ठिकाणी पूर्ण आलेली सुरक्षा यंत्रणा तोकडी आहे. या ठिकाणी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी सुरक्षारक्षक अपुरे असल्याचे सुरक्षा पुरणाऱ्या ठेकेदाराला सांगितले. मात्र त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही.
सेक्टर १२ येथील रहिवासी व पीएमआरडीए मध्ये समन्वय राहावा यासाठी अधिकारी नेमलेले आहेत. संबंधित अधिकारी कधीही प्रकल्पाची पाणी करण्यासाठी अथवा नागरिकांच्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी आले नाहीत. रहिवाशांनी याबाबत अनेक कळवूनही अधिकारी फिरकले नाही. मात्र, दोन दिवसापूर्वी आयुक्तांच्या पाठीमागे पीएमआरडी अधिकाऱ्यांचा लावा जमा दिसून आला.
खेळाचे मैदान विकसित झालेले नाही. सुरक्षा यंत्रणा वाढवणे आवश्यक असताना अपुरे सुरक्षारक्षक नेमले आहेत. या प्रकरणी संबंधित सुरक्षा पुरवणाऱ्या कंपनीची तक्रार देखील आयुक्तांकडे करण्यात आली आहे. सोलर व्यवस्था व्यवस्थित काम करत नाही. संबंधित विभागाने त्याची त्वरित पाहणी करून या समस्या तात्काळ सोडवाव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.
स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीचे तत्काळ निरसन करण्याचे आदेश विभागाला दिले आहेत. सोलर व ड्रेनेज संबंधित दुरुस्ती करण्यात येणार असून, इतरही समस्या सोडवल्या जातील,असे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त राहुल महिवाल यांनी सांगितले













































