पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

0
69

देहूरोड, दि. 24 (पीसीबी) : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एका तरुणाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई बुधवारी (दि. 23) सायंकाळी गांधीनगर देहूरोड येथे करण्यात आली.

नौशाद नजीर शेख (वय 25, रा. राजीव गांधीनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर गाडेकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने गांधीनगर देहूरोड येथून एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 40 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.