चाकण, दि. ११ (पीसीबी)
बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 10) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी येथे करण्यात आली.
नितीन भारत शिंदे (वय 24, रा. मेदनकरवाडी, ता. खेड. मूळ रा. परभणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुनील भागवत यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन शिंदे याने त्याच्याकडे बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 50 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.










































