पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

0
8

बावधन, दि. 14 (पीसीबी)

बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी बावधन पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून 60 हजार रुपये किमतीची एक देशी बनावटीची पिस्तूल आणि एक हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई सोमवारी (दि. 13) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास महादेवनगर सुसगाव येथे करण्यात आली.

हरी महादेव पवार (वय 29, रा. महादेवनगर, सुसगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार फारुख मुल्ला यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.