दापोडी, दि. 1३ (पीसीबी) : पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुंडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 12) सायंकाळी दापोडी येथे करण्यात आली. अनिकेत उर्फ सोन्या अशोक बाराथे (वय 25, रा. दापोडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार शुभम कदम यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवडी-दापोडी मार्गावर एकजण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अनिकेत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 50 हजार 500 रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.