पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

0
272
crime

पिंपरी, दि. 06 (पीसीबी) : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी (दि. ५) रात्री नऊ वाजताच्या सुमारास मोहननगर चिंचवड येथे करण्यात आली. रोहन राजेश खरे (वय २४, रा. मोहननगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रोहित वाघमारे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहननगर येथे म्हाडा बिल्डिंग समोर एकजण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून रोहन खरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५० हजार ५०० रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.