पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

0
64

सांगवी, दि. 17 : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल, दोन काडतुसे आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 15) रात्री दहा वाजताच्या सुमारास जुनी सांगवी येथे करण्यात आली.

पंकज मोहन शिंदे (वय 31, रा. जुनी सांगवी), ओंकार दादा शिंदे (वय 18, रा. संजय गांधी वसाहत, औंध) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी येथील वसंतदादा पुतळ्यासमोरील गणपती विसर्जन घाटाजवळ सांगवी पोलिसांना दोघेजण संशयितरित्या जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना अडवून त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे पिस्तूल आढळून आले. पिस्तुलाबाबत चौकशी केली असता त्याबाबत आरोपींकडे कोणताही परवाना नसल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी 25 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी जप्त केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.