पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक

0
279
crime

हिंजवडी,, दि. 22 (पीसीबी) : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एका तरुणाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 21) सकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास टीप टॉप हॉटेल समोर वाकड येथे करण्यात आली.

प्रवीण भाऊसाहेब वाघमारे (वय 25, रा. शिवूर, ता. जामखेड, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रवी पवार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडी येथील टीप टॉप हॉटेल समोर एक तरुण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून प्रवीण वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि काडतूस आढळून आले. आरोपी प्रवीण याच्याकडून 30 हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि 1000 रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.