पिस्तुल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

0
459

पिस्तुल बाळगल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्या कडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई शनिवारी (दि. 20) सायंकाळी म्हाळुंगे येथे करण्यात आली.

विनोद वाल्मिक कांबळे (वय 19, रा. बाणेर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रवी पवार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे येथे सपना वाईन शोप जवळ असलेल्या पान टपरीवर एक तर संशयितपणे थांबला असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन विनोद कांबळे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी विनोद याला अटक करून 30 हजारांचे शस्त्र जप्त केले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.