पिस्टल बाळगल्या प्रकरणी पिंपरीतील एकास अटक

0
566

पिंपरी, दि. २० (पीसीबी) : बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 19) सायंकाळी साडेसहा वाजता डेअरी फार्म रोड, पिंपरी येथे करण्यात आली.

प्रकाश उर्फ पक्या चिंतामण शिंदे (वय 45, रा. दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रोहित वाघमारे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेअरी फार्म रोडवर एकजण पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती मिळाल्याने पिंपरी पोलिसांनी प्रकाश शिंदे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी शस्त्र जप्त करत त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.