पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

0
689

आळंदी, दि. २५ (पीसीबी) – पिस्टल बाळगल्याप्रकरणी दरोडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 24) रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास चाकण रोड, आळंदी येथे करण्यात आली.

वीरभद्र रघुनाथ देवज्ञ (वय 30, रा. आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह राहुल सर्जन आणि अमोल साळवे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुमित देवकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी घाटावर एक तरुण पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून वीरभद्र देवज्ञ याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा 41 हजार रुपयांचा ऐवज आढळून आला. पोलिसांनी पिस्टल आणि काडतुसे जप्त केली. आरोपी वीरभद्र याने हे पिस्टल राहुल सर्जन आणि अमोल साळवे यांच्याकडून विकत घेतले असल्याचे तपासात समोर आल्याने त्या दोघांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.