बेम्हाळुंगे, दि. १३ (पीसीबी) – कायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 11) दुपारी म्हाळुंगे येथे केली.
श्रीवर्धन विजय तिकोणे (वय 27, रा. पौड, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नरेश बलसाने यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे येथे एक तरुण पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन श्रीवर्धन याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असे 66 हजार 500 रुपयांचे शस्त्र आढळून आले. पोलिसांनी श्रीवर्धन याला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.










































