पिस्टल बाळगल्या प्रकरणी एका तरुणाला अटक

0
781

डांगे चौक, दि. ०६ (पीसीबी) – पिस्टल बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई मंगळवारी (दि. 5) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास डांगे चौक येथे करण्यात आली.

विशाल उर्फ रावण सिद्धू बनसोडे (वय 25, रा. खडकवासला पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार वंदू गिरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिसांना माहिती मिळाली की, डांगे चौकात एक तरुण पिस्टल घेऊन येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून विशाल बनसोडे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि एक रिव्हॉल्वर तसेच दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी शस्त्रे जप्त करत विशाल बनसोडे याला अटक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.