पिस्टल बाळगल्या प्रकरणी थेरगावातील तरुणास अटक

0
370

देहूरोड, दि. ०४ (पीसीबी) – पिस्टल बाळगल्या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 2) रात्री साडे नऊ वाजता पारशी चाळ देहूरोड येथे करण्यात आली.

पंकज संतोष चोथे (वय 23, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद जंगीलवाड यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगले असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पारशी चाळ येथून पंकज चोथे याला ताब्यात घेतले. त्याच्या कडून एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 50 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.