वाकड ,दि.०७(पीसीबी) – बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 6) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास वेस्टर्न हायस्ट्रीट रोड, वाकड येथे करण्यात आली.
आशिष रामबाबू पाल (वय 21, रा. पिंपरीगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार वंदू गिरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न हायस्ट्रीट रोडवर एकजण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन आशिष पाल याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 10 हजार रुपये किमतीचे एक पिस्टल आणि तीन हजार रुपये किमतीच तीन जिवंत काडतुसे आढळली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.